Marathi Biodata Maker
✕

'कोथिंबीर पराठा'; अतिशय खमंग आणि कुरकुरीत Coriander Paratha Recipe

Updated: शुक्रवार, 17 जुलै 2026 (20:44 IST)
 
साहित्य-
बारीक चिरलेली कोथिंबीर: २ कप (स्वच्छ धुवून कोरडी केलेली)
गव्हाचे पीठ: २ कप
बेसन (हरभरा डाळीचे पीठ): २ ते ३ चमचे (पराठा खमंग होण्यासाठी)
आले-लसूण-मिरची पेस्ट: १ चमचा
मसाले: हळद (अर्धा चमचा), लाल तिखट (१ चमचा), धने-जिरे पूड (१ चमचा), ओवा (अर्धा चमचा)
पांढरे तीळ: १ मोठा चमचा
मीठ: चवीनुसार
तेल किंवा तूप: पराठा शेकण्यासाठी
 
कृती-
सर्वात आधी एका मोठ्या परातीत गव्हाचे पीठ आणि बेसन चाळून घ्या. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, आले-लसूण-मिरची पेस्ट, तीळ, ओवा, सर्व सुके मसाले आणि चवीनुसार मीठ टाका. सर्व साहित्य आधी सुकेच हाताने व्यवस्थित मिक्स करा (कारण कोथिंबिरीला पाणी सुटते). त्यानंतर थोडे थोडे पाणी घालत पराठ्यासाठी मऊ कणिक मळून घ्या. शेवटी वरून थोडे तेल लावून पीठ १० मिनिटे झाकून ठेवा. मळलेल्या पिठाचे मध्यम आकाराचे गोळे करा. कोरड्या पिठात घोळवून तुम्हाला आवडेल तसा गोल किंवा त्रिकोणी पराठा लाटून घ्या. लाटताना वरून थोडे अजून तीळ लावले तर पराठा दिसायला आणि खायला छान लागतो. आता तवा चांगला गरम करा. पराठा तव्यावर टाकून दोन्ही बाजूंनी तेल किंवा तूप लावून मध्यम आचेवर छान खरपूस आणि सोनेरी रंग येईपर्यंत शेकून घ्या. हा गरमागरम कोथिंबीर पराठा तुम्ही दही, पुदिन्याची चटणी, लिंबाचे लोणचे किंवा गरमागरम चहासोबत खाऊ शकता. मुलांच्या टिफिनसाठीही हा एक उत्तम आणि पौष्टिक पर्याय आहे. 
ALSO READ: 'चिझ-गार्लिक पराठा भन्नाट रेसिपी', अगदी हॉटेल स्टाईल चव घरीच
पराठ्याचे पीठ मळताना त्यात २ चमचे ताजे दही किंवा थोडी साय (मलाई) टाकल्यास पराठे अतिशय मऊ आणि चविष्ट होतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Mixed Vegetable Paratha चविष्ट आणि पौष्टिक मिक्स व्हेज पराठा रेसिपी
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: मुलांच्या टिफिनसाठी पौष्टिक आणि रंगीत नाश्ता बीटरूट पराठा एक उत्तम पर्याय

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

वांगी खाण्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या! कोणत्या लोकांनी वांगी खाताना घ्यावी काळजी?

Rashtrapati Bhavan Job: राष्ट्रपती भवनात सरकारी नोकरीची संधी कशी मिळते? थेट भरती, पात्रता आणि निवड प्रक्रिया जाणून घ्या!

रूप चौदसला चेहऱ्यावर हवा नैसर्गिक ग्लो? हा खास स्क्रब दिवाळीपर्यंत त्वचेला देईल चमकदार लुक

गोड पदार्थ जास्त खाण्याची सवय यकृतासाठी ठरू शकते घातक! लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी जाणून घ्या उपाय

चुकीच्या जीवनशैलीमुळे यकृताच्या आरोग्यावर होतोय परिणाम? निरोगी लिव्हरसाठी दररोज करा ही ५ योगासने!

पुढील लेख
Show comments