आरोग्यासाठी फायदेशीर पेरूची भाजी
साहित्य-
500 ग्रॅम कच्चा पेरू
एक टोमॅटो
1 चमचा तेल
एक चमचा हिरवी मिरची बारीक चिरलेली
1/2 चमचा आले पेस्ट
1 चमचा साखर
1 चमचा हळद
चिमूटभर हिंग
1/2 चमचा तिखट
1/2 चमचा धणे पूड
1/2 चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर
1/2 चमचे जिरे
चवीनुसार मीठ
कृती-
पेरूची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी पेरू आणि टोमॅटो धुवून स्वच्छ करावे. नंतर पेरू आणि टोमॅटोच्या बिया काढून त्यांचे तुकडे करून घ्यावे. यानंतर कढईत तेल गरम करावे. आता यामध्ये जिरे घालावे. नंतर त्यात हिरवी मिरची, आले पेस्ट आणि हिंग घालून परतून घ्या. नंतर पेरूचे तुकडे, लाल तिखट, हळद, धणेपूड आणि मीठ घालावे. तसेच ते मिक्स करून त्यात पाणी घालून चांगले शिजवून घ्यावे. मग पेरू मऊ झाल्यावर त्यात चिरलेला टोमॅटो आणि साखर घालावी. यानंतर 2 मिनिटे शिजवावे. नंतर यावर कोथिंबीर गार्निश करावी. तर चला तयार आहे आपली आरोग्यवर्धक पेरूची भाजी, पोळी किंवा पराठा सोबत सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik