Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

घरी खवा कसा बनवायचा, सोपी पद्धत जाणून घ्या

Updated: शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (16:48 IST)
 
आता मावा बनवण्यापूर्वी एक जड तळाचे भांडे घ्या आणि त्यात म्हशीचे मलईचे दूध उकळत ठेवा.
 
दूध उकळायला लागल्यावर आ‍च मंद करा आणि दर 2-4 मिनिटांनी ढवळत राहा.
 
दूध घट्ट होऊ लागल्यावर चमच्याने सतत ढवळत राहावे, जेणेकरून दूध जळणार नाही किंवा भांड्याच्या तळाला चिकटणार नाही.
 
काही वेळात उकळणारा दुधाचा मावा तयार झालेला दिसेल.
 
जेव्हा दूध घट्ट होऊन त्याचा गोळा तयार होतो तेव्हा समजून घ्या की तुमचा मावा तयार आहे.
 
आता गॅस बंद करा आणि मावा पूर्णपणे थंड होऊ द्या.
 
थंड झाल्यावर मावा अजूनच घट्ट होतो. 
 
या प्रकारे तुमचा मावा झटपट तयार झाला आहे. आता तुम्हाला हवं असेल तर याची मिठाई बनवा किंवा आवडीनुसार वापरा.
 
या व्यतिरिक्त घट्ट खवा तयार करण्यासाठी दुधाला पाचवा भाग राहिल्यार्पंत उकळावे लागतं आणि नंतर एका वाटीत त्याला जमवावे लागते. तर दाणेदार खवा तयार करण्यासाठी दूध उकळताना त्यात लिंबाचा रस घालतात.
 
टीप: तुम्ही तयार केलेला थंड मावा तुमच्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता आणि सुमारे 4-5 दिवस वापरू शकता. तर आता बाजारातून बनावटी मावा खरेदी करणे टाळा आणि घरीच शुद्ध मावा बनवा आणि सणासुदीला मिठाई बनवून कुटुंबातील सदस्यांना खाऊ घाला.

Edited by: Rupali Barve

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

Ahilyabai Holkar Punyatithi 2026 Vinamra Abhivadan अहिल्याबाई होळकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

Bail Pola Naivedyam बैल पोळ्याच्या दिवशी दाखवला जाणारा मुख्य व पारंपरिक नैवेद्य

पिठोरी नैवेद्यासाठी खास: पौष्टिक आणि चविष्ट बेदाणे घातलेली भाताची खीर

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Happy Bail Pola Images बैलपोळ्याच्या शुभेच्छा स्टेटस

पुढील लेख
Show comments