Daily Horoscope
✕

लंचसाठी अगदी रेस्टॉरंट स्टाईल पराठासोबत मसालेदार फुलकोबीची सुकी भाजी

Updated: शनिवार, 13 जून 2026 (16:42 IST)
साहित्य-
फुलकोबी (फ्लॉवर): १ मध्यम आकारचा (मध्यम तुकड्यांमध्ये कापलेला)
कांदा: १ मोठा (बारीक चिरलेला)
टोमॅटो: १ मोठा (बारीक चिरलेला)
आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट: १ मोठा चमचा
धणे-जिरे पावडर: १ चमचा
गरम मसाला: अर्धा छोटा चमचा
लाल तिखट (काश्मिरी): १ ते दीड चमचा (रंगासाठी आणि चवीसाठी)
हळद, जिरे, मोहरी, हिंग: फोडणीसाठी
बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तेल: गरजेनुसार

कृती-
१. कोबी स्वच्छ करणे : कापलेला फ्लॉवर एका पातेल्यात गरम पाणी, थोडे मीठ आणि हळद घालून ५ मिनिटे बाजूला ठेवून द्या. यामुळे कोबीमधील बारीक किडे किंवा कचरा पूर्णपणे निघून जातो. ५ मिनिटांनी पाणी उपसून कोबी कोरडा करून घ्या.

२. फोडणी आणि मसाला तयार करणे: कढईत २ मोठे चमचे तेल गरम करा. त्यात मोहरी, जिरे आणि हिंगाची फोडणी द्या. आता बारीक चिरलेला कांदा घालून तो छान सोनेरी रंगावर परतून घ्या. कांदा परतल्यावर आले-लसूण-मिरची पेस्ट घाला आणि कच्चा वास जाईपर्यंत १ मिनिट परता. आता टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्या.
ALSO READ: लंच किंवा डिनरसाठी दुधी भोपळ्याचे हे दोन पदार्थ करा ट्राय, लिहून घ्या रेसिपी
३. भाजी शिजवणे: गॅस बारीक करा. मसाल्यामध्ये हळद, लाल तिखट, धणे-जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घाला.आता स्वच्छ केलेला फुलकोबी या मसाल्यात टाका आणि व्यवस्थित मिक्स करा, जेणेकरून मसाला कोबीच्या प्रत्येक तुकड्याला लागेलभाजी सुकी करायची असल्याने पाणी घालू नका. कढईवर झाकण ठेवा आणि त्यावर थोडे पाणी ठेवा (झाकणावरील पाण्यामुळे वाफेवर भाजी छान शिजते). मंद आचेवर ७ ते १० मिनिटे भाजी वाफेवर शिजवून घ्या. मध्ये एकादा चमचा हलवून घ्या. कोबी मऊ शिजल्यावर वरून गरम मसाला आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरा. गॅस बंद करून २ मिनिटे झाकण ठेवून द्या, जेणेकरून गरम मसाल्याचा सुगंध भाजीत छान मुरेल. चालला तर गरमागरम, चमचमीत फुलकोबीची भाजी लंचसाठी तयार आहे!
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: लंचबॉक्स म्हणजे फक्त जेवण नसतं, तर तुमचं प्रेम असतं! टिफिन मध्ये द्या हे पदार्थ नवरोबा अगदी खुश होईल
Edited By- Dhanashri Naik
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

ऑक्टोबर ‘स्तन कर्करोग जागरूकता महिना’ October Breast Cancer Awareness Month

World Vegetarian Day 2026 जागतिक शाकाहारी दिनानिमित्त शाकाहारी खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

पितृपक्षात नैवेद्याच्या ताटात महत्वाची सात्विक आणि पारंपरिक ''लाल भोपळ्याची भाजी'' रेसिपी

रिकाम्या पोटी लसूण खाणे योग्य आहे का? जाणून घ्या फायदे आणि कोणी घ्यावी सावधगिरी

क्रीडा कोट्यातून कॉन्स्टेबल होण्याची संधी, १२६ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

पुढील लेख
Show comments