गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Updated : शनिवार, 14 जानेवारी 2023 (15:29 IST)

मकर संक्रांती साठी खास बनवा चविष्ट भोगीची भाजी

bhogi bhaji
मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीला भोगीची भाजी बनवली जाते. चला तर मग भोगीची भाजी कशी बनवायची साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.

साहित्य:
1 चिरलेला बटाटा, 1 मध्यम आकाराचं चिरलेलं वांगे, 1 चिरलेलं गाजर, अर्धी वाटी ताजे मटार, अर्धी वाटी हिरवे हरभरे, 1 मोठा चमचा भिजवलेले शेंगदाणे, 1 मोठी शेवगाची शेंग (लांब काप केलेली). 2 चमचे तिळकूट, 2 चमचे चिेंचेला कोळ, 1 मोठा गूळ, - मोठा चमचा ओलं खोबरं, चवीपुरते मीठ, फोडणीसाठी तेल
 
कृती:
पातेल्यात तेल गरम करून मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. यात शेंगदाणे, ताजे मटार, हिरवे हरभरे, बटाटा, शेवग्याच्या शेंगा आणि मीठ घालून वाफा काढाव्या. नंतर वांगं आणि गाजर घालून जरा पाणी घालून पातेल्यावर झाकण ठेवून शिजू द्यावे. भाज्या शिजत आल्यावर चिंच कोळ आणि काळा मसाला घालावा. शिजल्यावर गूळ, तिळाचा कूट, खोबरं घालावे. भाकरीबरोबर गरमागरम भाजी सर्व्ह करावी.
 
Edited By - Priya Dixit