suvichar
✕

मुलांसाठी बनवा चविष्ट ब्रेड उत्तपा

Updated: शनिवार, 23 जानेवारी 2021 (22:45 IST)
 
साहित्य -
 
4 ब्रेडचे स्लाइस, 1/2 कप रवा, 2 मोठे चमचे मैदा, 1/2 कप दही, 1 मोठा चमचा आलं किसलेलं, 1 कांदा बारीक चिरलेला, 1 ढोबळी मिरची बारीक चिरलेली ,1 टोमॅटो बारीक चिरलेला, 2 हिरव्या मिरच्या, मीठ चवीपुरती, तेल आवश्यकतेनुसार, पाणी आवश्यकतेनुसार. 
 
कृती -   
सर्वप्रथम ब्रेडच्या स्लाइसचे कडे कापून घ्या आणि पांढऱ्या भागावर पाणी लावून त्यांना मऊसर करा.हे स्लाइस रवा,तेल आणि दह्यासह मिसळून पेस्ट बनवून घ्या लक्षात ठेवा की पेस्ट अशी बनवायची आहे की सहजपणे तव्यावर पसरेल. या पेस्ट मध्ये भाज्या ढोबळी मिरची, हिरवी मिरची, टोमॅटो, कांदा घालून मिश्रण मिक्स करा.  आता या मिश्रणात शेवटून मीठ घाला जेणे करून मिश्रणाला पाणी सुटणार नाही. 
तवा गरम करण्यासाठी  ठेवा.आता तव्यावर तेल घाला आणि गरम झाल्यावर उत्तप्याचा घोळ घालून पसरवून द्या. एकी कडून शेकून झाल्यावर पालटून द्या आणि थोडंसं तेल सोडा. दोन्ही बाजूने शेकल्यावर गरम उत्तपे चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करा.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा होतोय? समस्या टाळण्यासाठी आजपासून फॉलो करा या सोप्या टिप्स

वजन वाढण्याची चिंता सोडा! रात्रीच्या जेवणात समाविष्ट करा हे कमी कॅलरीचे पदार्थ

जीन्स घातल्यावर कमरेभोवतीची चरबी दिसतेय? पोट आणि कंबरेचा घेर कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

नैतिक कथा : भुंगा आणि दोन माश्या, मोह आणि शहाणपण

Fasting shake Recipes कार्तिकी एकादशीनिमित्त पौष्टिक आणि चविष्ट 'उपवासाचे खास शेक'

पुढील लेख
Show comments