रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (20:45 IST)

किचन टिप्स जे आपल्या कामी येतील

1  फुलकोबी किंवा फ्लावर ची भाजी करताना भाजीत 1 चमचा दूध घाला. असं केल्यानं फुलकोबीचा रंग जाणार नाही आणि फुलकोबीची भाजी देखील खूप छानं दिसेल.  
 
2 कांद्याच्या शिवाय ग्रेव्ही बनवायची असल्यास  थोडीसी पान कोबी घेऊन त्याला बारीक बारीक चिरून घ्या ह्याला तेलात परतून कांद्याच्या पेस्ट प्रमाणे वाटून भाजीच्या ग्रेव्हीमध्ये घाला. या मुळे भाजीला चव चांगली येऊन भाजी चविष्ट बनेल. 
 
3 कांदा चिरण्याच्या 10 मिनिटा पूर्वी त्याला फ्रीज मध्ये ठेवा. कांदा चिरल्यावर आपल्या डोळ्यातून पाणी येणार नाही.
 
4 सॅलड चिरताना नेहमी भाज्या तिरप्या ठेवून चिराव्या. असं केल्यानं भाज्यात ज्यूस किंवा रस राहतो. 
 
5 सॅलड चिरण्याच्या पूर्वी टोमॅटो चांगल्या प्रकारे धुऊन फ्रीज मध्ये ठेवून द्या. 15 मिनिटानंतर चिरा. असं केल्यानं आपण इच्छित आकारात टोमॅटो चिरू शकता. 
 
6 गाजर आणि मुळ्याचा सॅलड करताना हे लक्षात ठेवा की  चिरल्यावर हे सॅलड जास्त काळ ठेवू नका.असं केल्यानं त्यामधील  सर्व पोषक घटक नष्ट होतात. 
 
7 भाजीची ग्रेव्ही करताना त्यामध्ये टोमॅटो घालावयाचे नसल्यास आपण सफरचंद वापरू शकता. या साठी सफरचंदाचे साल काढून लसूण, भाजकी शोप आणि एक वेलची वाटून घ्या आणि ग्रेव्ही करताना ह्याचा वापर करा. 
 
8 डाळ किंवा वरण शिजवताना त्या मध्ये थोडीसी हळद आणि काही थेंब तेलाचे घाला. या मुळे डाळ लवकर शिजते आणि चविष्ट बनते.