बुधवार, 25 सप्टेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

कोथिंबिर - पुदिना पूरी

साहित्य: 1 वाटी पुदिन्याची पाने, 1 वाटी कोथिंबीर, 3-4 हिरव्या मिरच्या, चवीपुरते मीठ, 1 चमचा लिंबाचा रस, कणीक, दही, तेल.
 
कृती: सर्वप्रथम पुदिन्याची पाने स्वच्छ धूवून ती बारिक करून घ्या. त्यानंतर कोथिंबीरही बारिक करून घ्या. मिरच्याचे बारीक तुकडे करून घ्या. पुदिन्याची बारीक केलेली पाने, कोथिंबिर, मिरच्याचे तुकडे हे एकत्रित मिक्‍सरच्या भांड्यात घेऊन त्यामध्ये चवीपुरते मीठ व लिंबाचा रस घालून त्याचे वाटण तयार करून घ्या. याची एकसारखी चटणी तयार करा. त्यानंतर कणीक घेऊन त्यात थोडसं दही मिसळून घ्या. या कणकेत ही एकत्रित केलेली चटणी मिसळा आणि कणीक मऊसर मळून घ्या. आता कणकीचे लहान-लहान गोळे करून घ्या. त्या गोळ्यांच्या पुऱ्या लाटा आणि गरम तेलात तळून घ्या. गरम-गरम पुऱ्या लोणचे किंवा सॉससोबत सर्व्ह करा.