suvichar
✕

चटकन बनणारी बटाटा ओव्याची खमंग कचोरी

Updated: मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021 (17:19 IST)
 
साहित्य-
4 उकडलेले बटाटे, 1 कप गव्हाचं पीठ,1/2 कप मैदा,1 कांदा बारीक चिरलेला,2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या,1/4 कप कोथिंबीर बारीक चिरलेली,1/2 लहान चमचा धणेपूड,1/2 लहान चमचा जिरेपूड,1/2 लहान चमचा ओवा, 1/4 चमचा लाल तिखट,1/4 चमचा आमसूलपूड, गरम मसाला पूड, मीठ आणि तळण्यासाठी आणि मोयनसाठी तेल,  
  
कृती -
सर्वप्रथम एका भांड्यात गव्हाचं पीठ, मैदा आणि मीठ घालून मिक्स करा. या मध्ये थोडंसं तेलाचं मोयन घाला आणि लागत लागत पाणी घालत घट्टसर मळून घ्या. आता 10 मिनिटे कणीक तशीच ठेवा.
 
सारण करण्यासाठी - 
दोन बटाटे मॅश करून घ्या. त्यामध्ये चिरलेला बारीक कांदा चिरलेल्या हिरव्यामिरच्या, कोथिंबीर, धणेपूड, जिरेपूड, तिखट, गरम मसाला पावडर, ओवा मिसळून मिश्रण तयार करा.   
कणकेचे गोळे करा आणि पुरी प्रमाणे लाटून घ्या. त्यामध्ये बटाट्याचे सारण भरा. मैदा लावून थोडी जाडसर लाटून घ्या आणि कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा आणि गरम तेलात या लाटलेल्या कचोरी सोडा. तांबुसं सोनेरी रंगाची होई पर्यंत तळून घ्या. गरम कचोरी हिरव्या चटणी किंवा सॉस सह सर्व्ह करा.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

MPSC परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यश मिळवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

ऑक्टोबरच्या उन्हात त्वचा काळवंडतेय? रोजच्या स्किनकेअरमध्ये या चुका टाळा

रात्री झोप येत नाही? झोपण्यापूर्वीच्या या ६ सवयी बदलून पाहा

नियमित योगाभ्यासाचे ६ आश्चर्यकारक फायदे; शरीर आणि मन राहील निरोगी!

प्रेरणादायी कथा : गर्वापासून मुक्ती; गोष्ट आदर आणि नम्रतेची

पुढील लेख
Show comments