Festival Posters
✕

Cake Recipe आईसाठी मदर्स डे निमित्त स्वतःच्या हाताने केक बनवण्यासारखा दुसरा आनंद नाही

Updated: शनिवार, 9 मे 2026 (19:02 IST)
कृती-
तयारी: कुकरच्या तळाशी मीठ पसरवा, त्यावर एक स्टँड ठेवा आणि शिटी न लावता १० मिनिटे मध्यम आचेवर गरम  करायला ठेवा. केकच्या भांड्याला तेल लावून त्यावर थोडे कोरडा मैदा भुरभुरा.
मिश्रण: एका मोठ्या बाऊलमध्ये दही आणि साखर एकत्र फेटा. त्यात तेल आणि व्हॅनिला एसेन्स घालून नीट मिक्स करा.
कोरडे जिन्नस: आता चाळणीने मैदा, बेकिंग पावडर आणि सोडा गाळून घ्या आणि ओल्या मिश्रणात टाका.
फेटणे: थोडे थोडे दूध घालून मिश्रण एकाच दिशेने फेटा. गुठळ्या होऊ देऊ नका.
बेकिंग: हे मिश्रण केकच्या भांड्यात ओता. कुकरमध्ये ठेवून मंद आचेवर ३५-४० मिनिटे बेक करा.
तपासणी: सुरी किंवा टूथपिक घालून चेक करा, ती स्वच्छ बाहेर आली की केक तयार!
 
२. इन्स्टंट बिस्किट चॉकलेट केक (फक्त ३ साहित्य)
जर तुम्हाला जास्त वेळ नसेल, तर हा सर्वात सोपा पर्याय आहे.
 
साहित्य-
चॉकलेट बिस्किटे: २ मोठे पुडे (उदा. ओरियो किंवा हॅप्पी-हॅप्पी)
दूध: १ कप (गरजेनुसार)
ईनो (Eno): १ पाकीट (फ्लेवर नसलेले)
 
कृती-
बिस्किटांची पावडर: बिस्किटे मोडून मिक्सरमध्ये त्याची बारीक पावडर करून घ्या.
बॅटर: या पावडरमध्ये थोडे थोडे दूध घालून सरसरीत मिश्रण तयार करा.
ईनो: शेवटी ईनो टाका आणि त्यावर एक चमचा दूध ओतून हलक्या हाताने मिक्स करा.
बेक करणे: तेल लावलेल्या भांड्यात मिश्रण ओता आणि ओव्हनमध्ये (१८०°C वर २५ मिनिटे) किंवा कुकरमध्ये ३० मिनिटे बेक करा.
ALSO READ: Mother's Day Special Recipes आईला सरप्राईज देण्यासाठी सोप्या, चविष्ट आणि दिसायला आकर्षक अशा रेसिपीज
काही टिप्स-
व्हिप्ड क्रीम: बाजारात मिळणारी क्रीम फेटून तुम्ही त्यावर 'Happy Mother's Day' लिहू शकता.
फ्रेश फ्रूट्स: आईला आवडणारी फळे (उदा. आंबा, स्ट्रॉबेरी) कापून वरून सजवा.
चॉकलेट गणाश: डार्क चॉकलेट आणि थोडी क्रीम वितळवून केकवर ओता, ज्यामुळे केक रिच दिसेल. केक पूर्णपणे थंड झाल्याशिवाय भांड्यातून बाहेर काढू नका, नाहीतर तो तुटू शकतो.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited by-Dhanashri Naik
ALSO READ: Mother's Day Special आईसाठी बनवा सोपी रेसिपी कप केक
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

गुलाबजाम मऊ आणि रसरशीत होण्यासाठी पाकात घाला 'ही' एक गोष्ट; पाहा सोपी पद्धत

दिवाळी फराळासाठी सामानाची यादी; काहीही विसरू नये म्हणून ही चेकलिस्ट

ग्रामीण महाराष्ट्रातील बोलीभाषांमधील वेगळे आणि सुंदर शब्द

आंबट तिखट बांगड्याचं तिखलं; पारंपारिक पद्धतीची चवदार रेसिपी

पुढील लेख
Show comments