रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. जागतिक महिला दिन
Written By

महिलादिन : 117 वर्षांची परंपरा

अमेरिकेमध्ये वस्त्रोद्योग क्षेत्रात काम कारणार्‍या महिलांनी आपल्या होणार्‍या शोषणाविरुध्द व अन्यायाविरुद्ध संघटितपणे पहिल्यांदा आवाज उठविला. शोषणकर्त्यांचे निषेध करीत महिला सामुदायिकरीत्या रस्त्यावर उतरून आपला आवाज बुलंद केला. त्यांनी आपल्यावरील अन्यायाचा प्रतिकार आपणच करायला हवा. या निश्चयाने महिलांनी लढा पुकारला. याचा परिणाम असा झाला महिलांमध्ये प्रचंड आत्मविश्वास जागृत झाला. शतकानुशतके पुरुषकेंद्री व्यवस्थेमध्ये कोंडीत सापडलेल्या महिलांनी आत्मविश्वासाने, खंबीरपणे मोकळा श्वास घेतला. महिलांमधील सुप्त शक्ती जागी झाली व त्यातून जगभरातील  स्त्रियांमध्ये एक प्रेरणा मिळाली. या संघटित शक्तीचा विजयी नारा देणारा दिवस होता ८ मार्च १९१0 तेव्हापासून गेली ११७ वर्षे हा दिवस 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' म्हणून साजरा केला जातो. 
 
 
 ८ मार्च 'महिला दिन' साजरा करीत असताना आजीही स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने मान मिळतो का? 'स्त्री-पुरुष समानता' आहे का? या गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे आहे.   स्त्री -पुरुष समानता हा नव्या शतकातील, नव्या संमाजनिर्मितीसाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे. प्राचीन काळापासून स्त्रीला दुय्यम वागणूक मिळत आला आहे. आमच्या धर्मग्रंथांनी आग्रहाने बजावून ठेवले आहे. लहानपणी वडिलांनी, तरुणपणी नवर्‍याने आणि म्हातारपणी मुलाने स्त्रीचे रक्षण करावे. स्त्रिया या पापयोनीतील अर्थात जन्मताच पापी आहेत, हे गीतेच्या नवव्या अध्ययातील बत्तीसाव्या इलोकांमध्ये सांगितले आहे. भरतमुनीच्या नाट्यशास्त्र, गुरुचरित्र या ग्रंथामध्ये स्त्रीचे माणूस म्हणून अवहेलना केलेले आढळते. बंद पडलेली सतीप्रथा पुन्हा पुराणकाळात फोफावली, याला थोर संस्कृत लेख वाणभट्ट यांनी विरुद्ध केला. आपल्या इ.स. ६२५ च्या दरम्यान लिहिलेल्या कादंबरीत ते म्हणतात, प्रिय व्यक्तीच्या पाठोपाठ मरण (सती जाणे) स्वीकारणे निष्फळ होय. या निर्णयामुउे मृत्यू व्यक्तीला काहीच लाभ होत नाही. मृत व्यक्ती आपल्या कर्मानुसार नियोजित स्थळी जात असेल त्तर आत्महत्येच्या पातकामुळे सती जाणारी व्यक्ती नरकात जाते. ३0 वर्षांपूर्वी राजस्थानमधील 'रूपकँवर' सती जाताना तिला कोणी अडविले नाही. धर्मातच असे सांगितले आहे म्हणून समाज मूग गिळून गप्प बसला. सती जाण्याच्या या  कार्यक्रमाला अनेक लोकप्रतिनिधीही उपस्थित होते. 
 
या परंपंरेच्या विचाराच्या विरोधात जर कोणी आवाज काढल्या तर त्याला धर्मद्वेष्ठा, धर्मबुडवे म्हणून वाळीत टाकत असत. या वाईट रूढीविरुद्ध स्त्री संताचे कार्य मोलाचे आहे. त्यांनी स्त्री -पुरुष समतेवर भर दिला.
 
ज्या भास्तामध्ये एकेकाळी आदर्श अशी मातृसत्ताक पद्धती होती, त्याच भारतात हजारो वर्षे स्त्रिला पुरुषी अहंकाराखाली दडपण्याचे काम केले. पण दीड -दोनशे वर्षांपूर्वी महात्मा फुले यांनी स्त्रीमुक्ती चळवळीचा विचार केला. स्त्री-पुरुष समतेचा विचार वैचारिक पातळीवर  महात्मा फुले यांनीच सर्वप्रथम मांडला होता. 
 
आज शिक्षणामुळे थोड्या फार प्रमाणात स्त्रियांमध्ये स्वातंत्र्याची समचेची जाणीव निर्मा झाली आहे. स्त्रीला स्वातंत्र्य द्या. भोग वस्तू समजू नका. सामाजिक न्याय जोपर्यंत स्त्रीला मिळत नाही, तोपर्यंत भारत महासत्ता होऊ शकत नाही. स्त्रीनेसुद्धा स्वत:ला दुळबे समजू नये, सामर्थ्य आहे, आत्मविश्वास वाढवा. सर्वच थरावर विशेषत. ग्रामीण भागात स्त्री-पुरुष समानता आणणे गरजेचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेप्रमाणे विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा, राज्यसभेमध्ये महिलांनासुद्धा आरक्षण मिळणे गरजेचे आवश्यक असल्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भावना व्यक्त केली आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनीही माझ्या संपत्तीत मुलगा-मुलगी यांना समान वाटा असल्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने विषमतेचा विचार मनातून हद्दपार करा.
 
जीवराज टाकळीकर