गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

कोहलीचा आई आणि अनुष्कासाठी खास संदेश

विराट कोहलीने त्याच्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या स्त्रियांसाठी खास संदेश दिला. भारतीय संघाचा कर्णधार विराटने याआधी व्हेलेंटाईन डेच्या दिवशी सोशल मीडियावर अभिनेत्री अनुष्का शर्मासोबतची पोस्ट शेअर करून आपल्या नात्याची जाहीर कबुलीच दिली होती. आता जागतिक महिला दिनाच्या निमित्तानेही विराटने त्याच्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या स्त्रियांसाठी खास संदेश दिला आहे.
विराटने आपल्या आई आणि अनुष्कासाठी ‍महिला दिनाचे औचित्य साधून इंस्टाग्रामवर दोघांचे आभार व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे. आपली आई आणि अनुष्कासोबत छानसा फोटो पोस्ट करून त्यासोबत विराट लिहितो...
 
जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा. विशेषत: माझ्या आयुष्यातील माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहणार्‍या दोन स्त्रियांना खूप शुभेच्छा. अतिशय कठीण काळात कुटुंबाला सांभळणारी माझी आई आणि आव्हानांचा मोठ्या हिमतीने सामना करून आयुष्याची समीकरणे बदलून काहीतरी नवे करण्याची तळमळ असणारी अनुष्का शर्मा. या दोघांनाही महिला दिनाच्या खूप शुभेच्छा.
 
ऑस्ट्रेलियाविरूद्धची बंगळुरू कसोटी जिंकल्यानंतर कोहलीने महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ही पोस्ट शेअर केली. कोहलीने लिहिलेला संदेश मार्मिक आणि तितकाच खरा देखील आहे.