रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. मातृ दिन
Written By
Last Modified: गुरूवार, 7 मे 2020 (11:36 IST)

Mother's Day Wishes In Marathi मातृदिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा

तुझ्या चेहर्‍यावरील हास्य हे असेच राहू दे
आणि माझ्या जीवनाला असाच अर्थ येऊ दे
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
**********

दु:खात हसवी, सुखात झुलवी, गाऊनी गोड अंगाई
जगात असे काहीही नाही, जशी माझी प्रिय आई
ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या हृदयी
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला माझी “आई”
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
**********
 
कोठेही न मागता, भरभरून मिळालेलं दान
म्हणजे आई ...
विधात्याच्या कृपेचं निर्भेळ वरदान
म्हणजे आई...
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
**********
 
‘देव’ प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही
म्हणून त्याने तुला निर्माण केलंय आई
आई तू म्हणजेच ‘आत्मारूपी ईश्वर’ आणि
वात्सल्याची जननी आहे.
तुझ्यासारखं प्रेम कोणीच देऊ शकत नाही म्हणून
मातृदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आई !!!
**********
 
आई तू म्हणजे अशी सावली आहे
जी नेहमी माझ्या सोबत असते,
जी उजेडातही आणि अंधारातही पुढे असते..
अगदी शेवटच्या श्वासापर्यंत’
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
**********
 
आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फिटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजवणं मिटणार नाही।
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।
**********
 
आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
कितीदा नव्या हृदयाचा संदेश
देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी।
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।
**********
 
डोळे मिटून प्रेम करते,
ती प्रेयसी …..
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते,
ती मैत्रीण ……
डोळे वटारून प्रेम करते,
ती पत्नी ……
आणि
डोळे मिटेपर्यँत प्रेम करते,
ती फक्त आई …..
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।
**********