आई

mother
Last Updated: शनिवार, 11 मे 2019 (16:13 IST)
देवा घरचं अनमोल लेणं म्हणजे लेक. तिच्या येण्याने घराच स्वरूपच बदलत, कालांतराने घरची लाडकी लेक बहीण, मुलगी अशा नात्याने गुंफलेली लेक सून, बायको, वहिनी अशा विविध अलंकारांनी अलंकृत होऊन "आई" ह्या अनुपम नात्याने सुशोभित होते आणि सुरू होतो जीवनाचा एक सुखद प्रवास "माय लेकराचा". जीवनाची अवीट गोडी देणार नातं म्हणजे मातृत्व. एका अबोध बाळाची भाषा समजून त्याला प्रतिसाद देणारी आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सावली देणारी फक्त आईच असते.
आपले कष्ट मुलांच्या हसण्यात सहज विसरणारी, शिक्षित असो वा अशिक्षित पालनपोषण करण्यात ती कधीच उणी पडत नाही. मुलांच्या सुखात सुख शोधणारी आपल्या अस्तित्वानं घराचं घरपण टिकवणारी बहुतेक प्रत्येक घरात गृहीत धरणारीच व्यक्ती असते. तिच्या भावना, इच्छा, अपेक्षा तिच्या बंद ओठात आणि पाणावलेल्या पापणीच असतात गरज असते फक्त त्या समजून घेण्याची.
जग बदलत आहे आचार विचार, जगण्याची पद्धत सर्वच काळानुरूप अतिशय गतिमान झाले आहे. नाती जपायला वेळ नाहीये, मान्य आहे, परंतु कालांतराने तुमच्या आईची गतिमान पाउले आता दमली आहेत त्या दमलेल्या पाउलांना सोबत अल्प सा काळ आपला वेग कमी करून आई या वडील दोघां साठी पण वेळ काढणे गरजेचे आहे. आता नाही तर कधीच नाही ही वेळ आली आहे.

आईला फक्त तुमचा वेळ हवा आहे, हाटेल, पार्टी या उपहार नको. तिला हवा आहे आपल्या मुलांचा सहवास, त्यांच्या बालपणीच्या आठवणी कारण तोच तिचा अनमोल ठेवा आहे आणि उर्वरित जीवनाचा आधार.
तर हा फक्त आपल्या आई साठीच राखीव ठेवून पुन्हा एकदा लहान होऊन तिच्या पदराची ऊब हाताचा स्पर्श, डोळ्यांतला स्नेहाचा आनंद पुन्हा नव्याने घेऊया. नक्कीच तुमचं मन आनंदाने आणि समाधानाने परिपूर्ण होईल. कृपया हे कधीच विसरू नका की ती आहे म्हणूनच आपण आहोत.

मातृशक्तीला शतशा नमन.
सौ. स्वाती दांडेकर


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

Health Tips : उशी न घेता झोपल्याचे आरोग्यदायक फायदे जाणून ...

Health Tips : उशी न घेता झोपल्याचे आरोग्यदायक फायदे जाणून घ्या
आपल्याला वर्षानुवर्षे उशी घेऊन झोपण्याची सवय आहे आणि आपण विचार करीत आहात की उशी न घेता ...

उन्हाळ्यात थंडगार मिल्कशेक, अगदी सोप्या पद्धतीने बनवा

उन्हाळ्यात थंडगार मिल्कशेक, अगदी सोप्या पद्धतीने बनवा
दुधात साखर मिसळून चांगले उकळून घ्या. थंड करून त्यात वेलची पावडर, इसेन्स आणि क्रीम मिसळा. ...

यकृत बिघडण्यामागील कारणे, तज्ज्ञांचा सल्ला

यकृत बिघडण्यामागील कारणे, तज्ज्ञांचा सल्ला
यकृत म्हणजे लिव्हर हे एखाद्या स्पॉंज सारखा शरीराचा नाजूक अंग असून यात बिघाड झाल्यास ...

Beauty Tips : त्वचेला सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी बेकिंग ...

Beauty Tips : त्वचेला सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी बेकिंग सोडा
आपल्या स्वयंपाकघरात अशी एक गोष्ट आहे जी आपल्या केसांना आणि त्वचेला सुंदर आणि निरोगी ...

Expert Advice सायनसची 3 कारणे, 9 लक्षणे आणि उपचार

Expert Advice सायनसची 3 कारणे, 9 लक्षणे आणि उपचार
आजकालच्या धावापळीच्या जीवनशैलीत लोकं आपल्या आरोग्याची काळजी घेउ शकत नाही, त्यामुळे ...