माझ्या मनाचा आरसा आहे 'माझी आई'

mothers day
वेबदुनिया|
'देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवालयी' हे गाणं ऐकलं होतं. सुरुवातीला गाण्याचा अर्थ मला लवकर कळला नाही. पण मी जेव्हा आईविषयी विचार केला, तेव्हा मला या गाण्याचा खरा अर्थ कळला.
देव सर्वच ठिकाणी असतो असे म्हणतात. आई म्हटल्यानंतर मला खरेच देवत्वाची, त्याच्या अस्तित्वाची जाणीव झाली. माझ्या साऱ्या चिंता दूर करण्यासाठी मी आजही आईच्या विचारांचा आधार घेते. > लग्नानंतर खऱ्या अर्थाने मला आईची उणीव प्रकर्षाने जाणवू लागली. लग्नाआधी आई हा एकमेव आधार होता. लग्नानंतर झालेली ताटातूट, आईला भेटण्याची उत्कट इच्छा, या साऱ्यांनी पापण्या कधी ओल्या व्हायच्या ते कळायचेच नाही. लग्नाआधी आईने दिलेल्या साऱ्या सूचना नकोशा वाटत, कधी कंटाळा तर कधी राग येई, पण आज खऱ्या अर्थाने तिच्या त्या सूचनांचा, त्या विचारांचा उपयोग मला आयुष्यात पुढलं पाऊल ठेवण्यासाठी होतोय. > आयुष्यात आपण अनेक नाती जोडतं असतो. प्रत्येक नात्यांचा काही तरी अर्थ आहे. काही नाती तडजोड असतात, काही नाती स्वार्थासाठी, काही नाती प्रेमापोटी तर काही नाती आपण केवळ पर्याय नसल्याचे स्वीकारत असतो. 'आई' हे एकमेव असं नातं आहे, ज्यात ना तडजोड आहे, ना स्वार्थ आहे, आणि ना हे नातं तात्पूरतं असतं. आई म्हणजे त्यागाची भावना, नात्यांचा ताजेपणा, मनातील
मांगल्य, आणि ओठांवरील हसू, डोळ्यांमधले आनंदाश्रू आणि विरहाची उत्कटता.

आजही दिवसभरात मन उदास झालं की आईची आठवण होते. आवडीचे पदार्थ ती खायला करून द्यायची, बाबांना मनवत मैत्रिणींसोबत चित्रपटाला जायचं म्हटलं की आधी मी आईकडे धाव घ्यायचे.

मी उदास असले, निराश झाले की दिवसभरात झालेल्या घटना ती अगदी ताज्या मनानं माझ्या जवळ बसून ऐकायची. त्या गप्पा कितीही कंटाळवाण्या असल्या तरी तिनं कधी तसं भासवलंच नाही.आजही दु:ख झालं की वाटतं एखाद्या लहान मुलाप्रमाणे धावत जाऊन आईला बिलगावं, खूप रडावं.

मला अजूनही वाटतं माझ्या मनाचा आरसा आहे माझी आई. आईला कधी माझ्या मनातील कोणतीही गोष्ट सांगण्याची गरज मला भासलीच नाही.

मी चिडले की सारा राग माझा आईवरच निघायचा. मी शांत झाले की माफी मागायचे, ति म्हणायची, अगं माझ्यावरच तुझं खरं प्रेम आहे, म्हणून तर माझ्यावर चिडण्याचा अधिकार तू मला दिलास. खरंच आई, मी आज स्वतः आई झाल्यावर मला कळतंय आई बनणं इतकं सोपं नाही. फक्त एकच विनंती आहे, माझ्या पाठीशी सदैव राहा.. अशीच.

- रुपाली बर्वे


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

Health Tips : उशी न घेता झोपल्याचे आरोग्यदायक फायदे जाणून ...

Health Tips : उशी न घेता झोपल्याचे आरोग्यदायक फायदे जाणून घ्या
आपल्याला वर्षानुवर्षे उशी घेऊन झोपण्याची सवय आहे आणि आपण विचार करीत आहात की उशी न घेता ...

उन्हाळ्यात थंडगार मिल्कशेक, अगदी सोप्या पद्धतीने बनवा

उन्हाळ्यात थंडगार मिल्कशेक, अगदी सोप्या पद्धतीने बनवा
दुधात साखर मिसळून चांगले उकळून घ्या. थंड करून त्यात वेलची पावडर, इसेन्स आणि क्रीम मिसळा. ...

यकृत बिघडण्यामागील कारणे, तज्ज्ञांचा सल्ला

यकृत बिघडण्यामागील कारणे, तज्ज्ञांचा सल्ला
यकृत म्हणजे लिव्हर हे एखाद्या स्पॉंज सारखा शरीराचा नाजूक अंग असून यात बिघाड झाल्यास ...

Beauty Tips : त्वचेला सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी बेकिंग ...

Beauty Tips : त्वचेला सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी बेकिंग सोडा
आपल्या स्वयंपाकघरात अशी एक गोष्ट आहे जी आपल्या केसांना आणि त्वचेला सुंदर आणि निरोगी ...

Expert Advice सायनसची 3 कारणे, 9 लक्षणे आणि उपचार

Expert Advice सायनसची 3 कारणे, 9 लक्षणे आणि उपचार
आजकालच्या धावापळीच्या जीवनशैलीत लोकं आपल्या आरोग्याची काळजी घेउ शकत नाही, त्यामुळे ...