गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

प्रत्येक देवाचे विशेष रक्षासूत्र, जाणून घ्या कोणत्या रंगाचा दोरा करेल आपली रक्षा

हिंदू धर्मात अनेक लोकं हातावर मौली, कलावा, रक्षासूत्र किंवा पवित्र बंधन बांधतात, याला रक्षासूत्र म्हणतात. जातकाने आपल्या राशी आणि इष्ट देवतानुसार सूत्र बांधतात. याने स्वत:वर येणार्‍या अडचणी आणि वेदनांपासून मुक्ती मिळते आणि अचानक येणाऱ्या संकटापासून बचाव देखील होतो.
 
जसे की लहान मुलांच्या हातात किंवा गळ्यात काळा दोरा बांधला जातो आणि याने वाईट दृष्टीपासून बचाव होतो असे मानले जाते. त्याच प्रकारे इतर रंगाचे सूत्रदेखील अनेक अडथळे आणि बाधांपासून रक्षा करतात. तरी प्रत्येक जातकाला आपल्या इष्ट देव, ग्रह-नक्षत्रानुसार रंग निवडायला हवे.
 
तर जाणून घ्या कोणती रास किंवा कोणत्या देवतांसाठी कोणत्या रंगाचा सूत्र बांधावा.
 
* शनीची कृपा मिळवण्यासाठी निळ्या रंगाचा सुती दोरा बांधावा.
 
* बुध या ग्रहासाठी हिरव्या रंगाचा मऊ दोरा बांधावा.
 
* गुरु आणि विष्णू यांची कृपा मिळवण्यासाठी हातात पिवळ्या रंगाचा रेशमी दोरा बांधायला हवा.
 
* शुक्र किंवा लक्ष्मीची कृपा हवी असल्यास पांढरा रेशमी दोरा बांधावा.
 
* चंद्र किंवा महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पांढरा दोरा बांधणे योग्य ठरेल.
 
* राहू-केतू आणि भैरव यांना प्रसन्न करण्यासाठी आणि यांची कृपा प्राप्तीसाठी काळ्या रंगाचा दोरा बांधावा.
 
* मंगल आणि हनुमानाची कृपा दृष्टी प्राप्त करायची असेल तर लाल रंगाचा दोरा बांधणे योग्य ठरेल.
 
तर आपल्या ग्रह-नक्षत्रांची स्थिती जाणून त्या रंगाचा दोरा बांधणे आपल्या भाग्यासाठी योग्य ठरेल. दोरा पवित्र काळात, पवित्र स्थानावर, पवित्र मनाने आणि मंत्रोउच्चारासह बांधवावा.