शनिवार, 3 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated: गुरूवार, 15 जुलै 2021 (20:05 IST)

डोंबिवली रेल्वे स्टेशनजवळ इमारतीला भीषण आग

डोंबिवली पूर्व परिसरात एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागलेली आग इतकी भीषण आहे की धुराचे लोट संपूर्ण परिसरात पसरले आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आग लागल्याने इमारतीत काही नागरिक अडकल्याची भीती सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे.
 
दुपारी २:५५ वाजताच्या सुमारास डोंबिवली स्टेशनजवळील लक्ष्मी निवास इमारतीला ही आग लागली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळालेली नाही. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गोडाऊनमध्ये ही सर्वप्रथम आग लागली आणि त्यानंतर इमारतीत इतरत्र पसरली. 
 
या इमारतीत गोडाऊन असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच आग लागल्याने इमारतीत काही नागरिक अडकल्याची भीती सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे.