रविवार, 13 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024 (08:05 IST)

महाराष्ट्रातून मान्सून परतीच्या प्रसवासाला, लवकर मुंबईतून परतणार

monsoon update
हवामान विभागाने यंदाच्या मान्सून हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता, व तसेच तो खरा देखील ठरला आहे.
 
देशातून दक्षिण-पश्चिम मान्सूनचे प्रस्थान  सुरू झाले असून मान्सून महाराष्ट्रातून देखील परतीच्या प्रवासाला निघाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग नुसार, नंदुरबार जिल्ह्यातून मान्सून 2024 माघार घेण्यास सुरुवात झाली असून येत्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी काही भागांतून मान्सून परतीसाठी अनुकूल परिस्थिती आहे.
 
तज्ज्ञाच्या मते, नैऋत्य मोसमी पावसाची माघार 5 ऑक्टोबरपासून सुरू झाली, ही महाराष्ट्रात परतीची सामान्य तारीख आहे. लवकरच तो संपूर्ण नंदुरबारमधून माघार घेणार असून येत्या दोन-तीन दिवसांत राज्याच्या अधिक भागातून मान्सून माघार घेईल, असा अंदाज आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे यंदा महाराष्ट्रातून मान्सून माघार घेण्यास विलंब होऊ शकतो, असा अंदाज  हवामान तज्ज्ञांनी यापूर्वी वर्तवला होता. तसेच मान्सूनच्या माघारीच्या प्रक्रियेला लवकरच वेग येण्याची शक्यता आहे.
 
देशातील मान्सून साधारणपणे 1 जूनच्या आसपास केरळमध्ये पोहोचतो आणि सप्टेंबरच्या मध्यापासून त्याचे प्रस्थान सुरू होते. तसेच ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईत रिमझिम पाऊस आणि गडगडाट होण्याची शक्यता आहे आणि या दरम्यान मान्सून निघू शकतो. तर साधारणपणे 10 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण राज्यातून मान्सून निघून जातो.