1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 26 जून 2023 (11:32 IST)

मुंबईतील घाटकोपरमध्ये पावसामुळे घर कोसळलं, ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा मृत्यू

Ghatkopar building collaps मुंबईतील घाटकोपर परिसरात रविवारी तीन मजली इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक गाडले गेले. मात्र, घटनेनंतर लगेचच बचाव पथकाने लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. रविवारी चार जणांना बाहेर काढण्यात आले. त्याचवेळी बेपत्ता असलेल्या अन्य दोघांचे मृतदेह सापडले आहेत.

ढिगाऱ्यातून दोन मृतदेह बाहेर काढले
घाटकोपर इमारत कोसळल्याप्रकरणी शोध आणि बचाव कार्य पूर्ण झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बेपत्ता झालेल्या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
 
पावसामुळे घर कोसळले
मुंबईत मुसळधार पावसानंतर घर कोसळले होते, ज्यामध्ये लोक गाडले गेले होते. त्याचबरोबर अशा अनेक घटना देशाच्या इतर भागातूनही पाहायला मिळत आहेत.
 
चार लोक वाचले
पूर्व घाटकोपरच्या राजावाडी कॉलनीत तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने रविवारी दिली होती. चार जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून दोन जण अजूनही आत अडकले आहेत. या दोन लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.