रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By

Corona : मुंबईतील आयआयटीचे वर्ग, प्रयोगशाळा 29 मार्चपर्यंत बंद

सध्या राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 31 वर येऊन (Corona Effect On Mumbai IIT) पोहोचली आहे. कोरोनाची वाढती दहशत पाहता मुंबई आयआयटीने प्रतिबंधात्मक खबरदारी म्हणून मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई आयआयटीने 29 मार्चपर्यंत सर्व विभागाचे वर्ग, तसेच प्रयोगशाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
एकीकडे, राज्य सरकारने राज्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. त्यानंतर आता मुंबई आयआयटीकडूनही सर्व विद्यार्थ्यांना ई-मेल द्वारे 29 मार्चपर्यंत वर्ग, तसेच प्रयोगशाळा बंद ठेवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांना 29 मार्चपर्यंत त्यांच्या घरी जायचे असल्यास त्यासंबंधी परवानगी देण्यात आली आहे.
 
ज्या विद्यार्थ्यांना घरी जाताना प्रवासासाठी काही अडचण येत असेल, शिवाय मुंबई आयआयटीत शिकत असलेल्या बाहेर देशातील विद्यार्थ्यांना सूचना करण्यात आली आहे की, ते मुंबई आयआयटी हॉस्टेलमध्ये सुट्टी दरम्यान राहू शकतील.
 
राज्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता सर्व शाळा, कॉलेज आणि मॉल्स बंद ठेवण्याचा राज्य सरकारने घेतला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची माहिती दिली. त्यामुळे राज्यातील सर्व शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
 
शिक्षण विभागाच्या पत्रकानुसार, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका आणि सर्व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा, महाविद्यालये या 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्यात याद्वारे सूचित करण्यात येत आहे.