रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024 (09:57 IST)

मुंबईत एका वृद्धाची झाली एक कोटींची फसवणूक

Mumbai News : मुंबईत एका महिलेने सरकारी योजनेंतर्गत फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून एका वृद्धाची एक कोटी रुपयांची फसवणूक केली. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून या महिलेने वृद्ध महिला आणि तिच्या कुटुंबीयांची फसवणूक केली. आरोपी महिलेविरुद्ध दादर पोलिस ठाण्यात फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी एका अधिकाऱ्याने सांगितले की, 77 वर्षीय वृद्ध महिला यांनी दादर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या म्हणाल्या की, आरोपी महिलेने आपली, त्यांची बहीण आणि मेहुणी यांची फसवणूक करण्यासाठी म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवले. वृद्ध महिलेने यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका नातेवाईकाने आरोपीची तीन वर्षांपूर्वी रुग्णालयात ओळख करून दिली होती. म्हाडाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी तिचा चांगला संपर्क आहे आणि तिला काही योजनेद्वारे फ्लॅट त्यांच्या नावावर मिळू शकतो, असा दावा आरोपीने हिने केला होता.
 
नंतर आरोपी महिलेने तिला, तिची बहीण आणि मेव्हणीला प्रभादेवी येथील आपल्या घरी बोलावले. यादरम्यान, तिने कथितपणे दावा केला की ती म्हाडाच्या लॉटरीद्वारे 20 लाख रुपयांमध्ये गोरेगावमध्ये 2BHK फ्लॅट मिळवू शकते.  
 
तसेच आरोपीने तक्रारदार महिला यांच्या मेहुणीकडून 60 लाख रुपये आणि बहिणीकडून 20 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. आरोपी महिलेने पीडित वृद्ध महिला आणि त्यांच्या नातेवाईकांची एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. तक्रारदार वृद्ध महिला यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दाव्याची पडताळणी करून आरोपी महिला विरुद्ध गुन्हा दाखल केला. अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींविरुद्ध समन्स बजावून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

Edited By- Dhanashri Naik