मनसेचा सवाल, तर मुंबई तिसऱ्या टप्प्यात का?
राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध हटवण्यावरून झालेल्या मोठ्या गोंधळानंतर राज्य सरकारने अनलॉकचे आदेश जारी केले आहेत. ५ टप्प्यांमध्ये राज्यात अनलॉक केलं जाणार आहे. या पाच टप्प्यांमध्ये मुंबईचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे. यावरून मनसेने सवाल उपस्थित केला आहे. तसंच शिवसेना आणि सरकारवर निशाणा साधला आहे.
संदीप देशपांडे यांनी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “मुंबई मॉडेलचं कौतुक करणारे तोंडावर आपटले आहेत. जर मुंबई मॉडेल यशस्वी होते तर मुंबई तिसऱ्या टप्प्यात का?” असं ट्विट करत संदीप देशपांडे यांनी सवाल उपस्थित केला आहे.