Dharma Sangrah
✕

शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी पालघरमधून बेपत्ता,पोलिसांनी शोधासाठी 8 पथके तयार केली

Updated: बुधवार, 29 जानेवारी 2025 (16:30 IST)
10 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेले शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी अशोक धोडी यांचा शोध घेण्यासाठी आता पोलिसांनी 8 पथके तयार केली असून या घटनेप्रकरणी 4 जणांना ताब्यात घेतले आहे.त्यापैकी 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज, बुधवारी सायंकाळपर्यंत या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश येईल, असा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
ALSO READ: महाकुंभातील चेंगराचेंगरीवर संजय राऊत संतापले, म्हणाले- हा भाजपच्या मार्केटिंगचा भाग आहे
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिसांची आठ पथके तयार केली आहेत. ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून गुप्तचर, तांत्रिक डेटा आणि गोळा केलेली माहिती यावर पोलीस काम करत आहेत.
 
मात्र, संशयित पोलिसांच्या ताब्यातून पळून गेल्याने तपास थोडा गुंतागुंतीचा होतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना नेते धोडी बेपत्ता होण्याचे कारण त्यांच्या कुटुंबात सुरू असलेल्या मालमत्तेच्या वादाशी संबंधित असू शकते, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
ALSO READ: महाकुंभमधील चेंगराचेंगरी वर फडणवीस आणि बावनकुळेंनी चिंता व्यक्त केली
पालघरचे एसपी पाटील म्हणाले की,धोड़ी हे 20 जानेवारी रोजी घोलवडपासून 15 किमी अंतरावर डहाणूकडे जाताना दिसले होते. दुपारी 4 वाजता धोडी डहाणूला पोहोचले आणि सायंकाळी 6 वाजता घोलवडला परतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथक मोबाईल ट्रॅकिंग आणि इतर तांत्रिक पाळत ठेवून धोडीचा शोध घेण्याचे प्रयत्न करत आहे.
Edited By - Priya Dixit 
 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

महाराष्ट्रातील हवाई आणि नवीन रुग्णवाहिका सेवांसाठी आता एकसमान नियम! समिती स्थापन करण्यात आली

नागपूर : हॉटलेच्या रुमध्ये मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याची आत्महत्या! नुकताच झाला होता साखरपुडा

LIVE: महाराष्ट्राला पीएम स्वनिधी सन्मान पुरस्कार २०२६ अंतर्गत पाच पुरस्कार मिळाले

पीएम स्वनिधी पुरस्कार २०२६ अंतर्गत महाराष्ट्राला पाच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त

आग्रा-लखनौ द्रुतगती मार्गावर ट्रकची स्कूल बसला धडक, ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू तर ३५ जखमी

पुढील लेख
Show comments