बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 6 फेब्रुवारी 2020 (13:22 IST)

मुख्यमंत्री अशी साजरी करणार शिवजयंती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवजयंती साजरी करण्याचा मार्ग शोधून काढला आहे. आता उद्धव ठाकरे तारखेनुसार म्हणजे १९ फेब्रुवारीला येणाऱ्या शिवजयंतीवेळी शासनातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थिती लावतील. तर शिवसेना पक्ष पूर्वीप्रमाणेच तिथीनुसार शिवजयंती साजरी करेल. 
 
याआधी महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यामुळे सरकार आता नेमक्या कोणत्या तारखेला शिवजयंती साजरी करणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. शिवसेनेकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार साजरी करण्यात येते. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून तारखेनुसार जयंती साजरी करण्यात येते. विरोधकांनी या मुद्द्यावरून शिवसेनेला घेरण्याचाही प्रयत्न केला होता. 
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी  शिवजयंती १९ फेब्रुवारीला साजरी करा, असे ट्विट केले होते. तिथीचा हट्ट सोडा आणि १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करा. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.