Daily Horoscope
✕

हातोड्याने खून केल्याप्रकरणी दोन मुकबधिरांना अटक

Updated: मंगळवार, 6 ऑगस्ट 2024 (13:24 IST)
 
अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही आरोपी मुके-बहिरे आहेत, तर मृतकही मुकबधीर असून ते एकमेकांना ओळखत होते. या प्रकरणाचा चार तासांत खुलासा झाल्याचे त्यांनी सांगितले.
 
रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) कॉन्स्टेबलने प्लॅटफॉर्म क्रमांक 11 वर एका मोठ्या ट्रॉली बॅगसह एक व्यक्ती पाहिल्यावर ही घटना उघडकीस आली, असे अधिकाऱ्याने सांगितले. संशयाच्या आधारे त्याला ताब्यात घेऊन बॅगेची झडती घेतली असता मृतदेह सापडला. हा मृतदेह अर्शद अली सादिक अली शेख (30, रा. कलिना, सांताक्रूझ) याचा असल्याचे तपासात समोर आले आहे.
 
दादर रेल्वे पोलीस अधिकारी म्हणाले, त्या व्यक्तीला हातोड्याने मारहाण करण्यात आली. पायधोनी येथे खून झाल्यामुळे प्रकरण तिकडे वर्ग करण्यात आले.
 
दादर स्थानकात अटक केलेल्या व्यक्तीचे नाव जय प्रवीण चावडा आहे, तर सहआरोपी शिवजित सुरेंद्र सिंग याला शेजारच्या ठाण्यातील उल्हासनगर येथून पकडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

Asian Champions Trophy भारताने जपानचा धुव्वा उडवत इतिहास रचला! सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले

मुंबई विमानतळावर मोठा बदल; १२ परदेशी एअरलाइन्सची उड्डाणे स्थलांतरित होणार

LIVE: मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडून दुष्काळ निवारण मदतीबाबत उत्तर मागितले

बंगळूरमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीसह सात जणांची जात्याने वार करून हत्या; कॅब चालक ताब्यात

अँटिलिया बॉम्बस्फोट प्रकरण; मुंबई उच्च न्यायालयाने माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा जामीन रद्द केला

पुढील लेख
Show comments