1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 29 जुलै 2024 (16:27 IST)

जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सोपोर येथे स्फोटात 4 ठार

baramulla
जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सोपोर भागात झालेल्या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला आहे. शेर कॉलोनीत भंगार विक्रेता ट्रक मधून माल उतरवत असताना ही घटना घडली. मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहे. घटनास्थळी लोकांची गर्दी झाली असून सर्वत्र गोंधळ सुरु आहे. 
 
सदर घटना बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर शहरात शेर कॉलोनीत भंगार विक्रेत्याच्या दुकानात हा स्फोट झाला. घटनेच्या वेळी काही लोक ट्रकमधून कचरा काढत असताना दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर नंतर दोघे मरण पावले. हे सर्व जण शेर कॉलोनीत राहणारे होते. हा स्फोट कशामुळे झाला फॉरेन्सिक 
तज्ज्ञांची टीम घटनास्थळी पोहोचली असून तपास सुरु आहे.  
Edited By- Priya Dixit