मंगळवार, 27 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 10 डिसेंबर 2016 (17:02 IST)

आज पासून पाचशेंच्या नोटा पूर्ण बंद

500 note
आजपासून जुनी पाचशेची नोट रेल्वे तिकिट, बसचं तिकिट, आणि मेट्रोच्या तिकिट काऊंटरवर चालणार नाही. नोटबंदीच्या निर्णयानंतर प्रवास करणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारनं  १० डिसेंबरपर्यंत तिकिट काऊंटरवर जुनी ५०० ची नोट स्वीकारावी असे आदेश दिले होते. आता लोकांच्या हातात नवीन चलन पडलं आहे. त्यामुळे आजपासून रेल्वे, बस आणि मेट्रोच्या तिकिटाला नवी पाचशेची नोटच वापरता येईल. दरम्यान, आजपासून सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. दुसरा शनिवार, रविवार आणि ईद या सुट्ट्या सलग आल्यामुळं बँकां सुट्टी  आहे. त्यामुळं रक्कम काढण्यासाठी काल बँका आणि एटीएम बाहेर मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. तर आता चलनातून ५०० रु जुन्या नोटा पूर्ण बंद झाल्या आहेत.