रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

आता विमानतळावर आधारद्वारे प्रवेश

बेंगलोर इंटरनॅशनल एयरपोर्ट लिमिटेडने (BIAL) केंपगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘आधार’ आणि बायोमेट्रीक प्रवेश सुरू करणार आहेत.  त्यामुळे आधारद्वारे प्रवेश देणारे हे पहिलेच विमानतळ ठरणार आहे.

बीआयएएलने जारी केलेल्या रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (RFP) नुसार विमानतळावर डिसेंबर २०१८ पर्यंत आधार प्रवेश प्रणाली कार्यन्वित होणे अपेक्षित आहे. यामुळे विमानतळ स्मार्ट आणि डिजिटल होणार आहे. आधार आणि बायोमेट्रीकद्वारे प्रवेश सुरू केल्याने अनेक फायदे होणार असल्याचे बीआयएएलने सांगितले. व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी तसेच त्याची इतर माहिती तपासण्यासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. प्रत्येक चेकपॉईंटवर ५ सेकंदात व्हेरिफिकेशन होईल.  विमानतळावरील इतर चौकशी आणि त्यासाठी लागणारा सरासरी २५ मिनिटांचा वेळ १० मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. यामुळे एकाच गेटमधून कमी वेळेत जास्तीत जास्त प्रवाशांना जाता येईल.