सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 16 सप्टेंबर 2017 (09:57 IST)

आसाराम बापूने स्वत:ला गाढव म्हटले

खिल भारतीय आखाडा परिषदेच्या कार्यकारिणीने भोंदूबाबांच्या यादीत समावेश केल्यानंतर भडकलेल्या आसाराम बापूने स्वत:ला गाढव म्हटले आहे.  

आसाराम बापूवर २०१३ मध्ये जोधपूर येथील आश्रमात एका मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. तेव्हापासून तो तुरुंगात आहे. आसारामने जामीनासाठी आतापर्यंत सातवेळा अर्ज केला. मात्र न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला.

आसारामला गुरुवारी सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पत्रकाराने त्यांना विचारले, अखिल भारतीय आखाडा परिषदेने "भोंदूबाबा"  म्हटले आहे. आता तुम्ही कोणत्या वर्गात आहात? त्यावर  आसारामने मी गाढवांच्या वर्गात आहे, असे उत्तर दिले आहे.