Daily Horoscope

राहुल गांधी आणि अमित शहा यांच्यात ट्विटरवर ‘खून-खराबा’

Updated: गुरूवार, 17 मे 2018 (16:31 IST)

कर्नाटकचे निकाल लागल्यानंतर पत्रकारांसमोर न आलेल्या राहुल गांधी यांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी ट्विटरचा आधार घेतला आहे. त्यांनी गुरुवारी सकाळी ट्विट केलं ज्यात टीका केली की ‘संख्याबळ नसतानाही भाजपचा सत्तास्थापनेचा हट्ट ही संविधानाची उडवलेली थट्टा आहे. भाजप पोकळ विजयाचा आनंद साजरा करीत आहे आणि देश लोकशाहीच्या पराभवाबद्दल शोक व्यक्त करीत आहे’

या टीकेला उत्तर देण्यासाठी अमित शहा पुढे आले असून त्यांनी एक ट्विट केलं ज्यात त्यांनी म्हटलंय की काँग्रेसने संधीसाधूपणा करीत जेडीएसशी हातमिळवणी केली तेव्हाच लोकशाहीचा खून झाला. ही युती कर्नाटकच्या भल्यासाठी नसून ही राजकीय फायद्यासाठी केलेली युती आहे, धिक्कार असो असे म्हटले.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments