suvichar

Another blow to Sharad Pawar group शरद पवार गटाला आणखी एक धक्का

Updated: गुरूवार, 20 जुलै 2023 (20:59 IST)
 
अजित पवार यांच्या गटाला नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी पाठिंबा दर्शविला आहे. पाठिंबा दर्शविणाऱ्यांमध्ये ७ आमदारांचा सामावेश आहे. नागालँड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलं की, संपूर्ण प्रदेश कार्यकरणीने आणि जिल्हाध्यक्षांनी चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात नागालँडमध्ये पक्षाला मजबूत बनवायचं निश्चित केलं.
 
नागालँड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष वानथुंग ओडियो यांनी आज दिल्लीत कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांची भेट घेऊन अजित पवार गटाला आपला पाठिंबा दर्शवला. शिवाय सात आमदार आणि इतर पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याचं शपथपत्र प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सोपवले आहे. नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात आमदारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर  केल्यामुळे अजित पवारांची बाजू  आणखी भक्कम झाल्याचे दिसून येत आहे.
 
दरम्यान शरद पवारांनी अद्यापही काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. असे असतानाच आता नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सात आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे यावर आता शरद पवार काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments