1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 21 नोव्हेंबर 2023 (11:22 IST)

भारताचा विश्वचषकात पराभव झाल्यामुळे बंगालच्या तरुणाची आत्महत्या

suicide
19 नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघात विश्वचषकातील अंतिम सामना  अहमदाबादच्या नरेंद्रमोदी स्टेडियमवर झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव केला. या पराभवानंतर अनेक ठिकाणी टीव्ही फोडण्यात आले. तर बंगालमध्ये एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बंगालच्या बांकुडा जिल्ह्यात बेलियाटोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 19 नोव्हेंबरच्या रात्री घडली.

राहुल लोहार वय वर्ष 23 असे या तरुणाचे नाव आहे. राहुलच्या एका नातेवाईकाने सांगितले की , राहुल एका कापडी दुकानात काम करत होता. रविवारी त्याने भारत ऑस्ट्रेलियाचे फायनल असल्यामुळे कामावरून रजा घेतली होती. 

सामन्यात भारताचा पराभव झाल्यामुळे राहुल ने निराश होऊन टोकाचं पाऊल घेतलं. आणि घरात तो एकटाच असताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला काहीही त्रास नव्हता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी जाऊन राहुलचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. पोलिसांनी अनॆसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली असून पुढील तपास करत आहे. 
 
 
 Edited by - Priya Dixit