शनिवार, 1 एप्रिल 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified शनिवार, 3 डिसेंबर 2022 (15:54 IST)

48 तासांत महिलेचे दोनदा लग्न, आधी पुतण्याशी, नंतर पतीशी

बिहारमधील खगरिया जिल्ह्यात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. लग्नाच्या 12 वर्षांनंतर मामीला भाच्याशी प्रेम झाले. नवरा कामानिमित्त घराबाहेर असल्यामुळे भाचा मामीच्या घरी येऊ लागला. एके दिवशी दोघेही आक्षेपार्ह अवस्थेत पकडले गेले. राग न करता नवर्‍याने त्याग करून आपल्या पत्नीचे आपल्या भाच्याशी लग्न लावून दिले.
 
गावाचे लोक एकत्र होऊ लागले. तेव्हा सर्वांसमोर भाचा संतोष ने आपल्या मामीच्या भांगेत सिंदूर भरले. एक करार देखील करण्यात आला ज्यात पत्नी स्वइच्छेने नवर्‍याला सोडत असल्याचे नमूद केले गेले. आणि संतोषसोबत राहू इच्छित असल्यामुळे पतीसोबत संबंध ठेवणार नाही असे स्पष्ट केले गेले. या प्रकरणाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला.
 
मात्र भाचा संतोष आणि मामी यांचे लग्न 48 तासही टिकू शकले नाही. मामीसोबत घरी पोहचल्यावर घरात कुटुंबीयांनी एकच गोंधळ घातला. त्यांचे संबंध बेकायदेशीर असल्याचे सांगून त्यांनी ते स्वीकारण्यास नकार दिला. कुटुंबीयांचा विरोध पाहून संतोषचा धीर सुटला आणि त्याचा प्रेमाचा ताप उतरला. तो पत्नीला सोडून पळून गेला.
 
भाचा संतोष फरार झाल्यामुळे महिलेला देखील आपली चूक कळली. ती पहिल्या नवर्‍याकडे गेली. सुरुवातीला नवर्‍याने तिच्यासोबत राहण्यास नकार दिला. नंतर तिला सोबत ठेवण्याचे मान्य केले आणि पुन्हा आपल्या पत्नीशी लग्न केले.