शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 17 डिसेंबर 2016 (10:57 IST)

काळा पैसाधारकांची माहिती देण्यासाठी ईमेल आयडी सुरु

काळा पैसाधारकांची माहिती देता यावी यासाठी केंद्र सरकारने आता ईमेल आयडी सुरु केला आहे. काळा पैसाधारकांची माहिती कोणाकडे असल्यास ते या ईमेलवर माहिती देऊ शकतील अशी माहिती केंद्रीय महसूल सचिव हसमुख अढिया यांनी दिली आहे. यासाठी [email protected] असा ईमेल आयडी आहे. या  ईमेलवर लक्ष ठेवण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले असून माहिती मिळताच संबंधीतांवर तातडीने कारवाई करण्यात येणार आहे. 
 
याशिवाय पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत  बेहिशेबी रक्कम जाहीर करता येणार असून ३१ मार्चपर्यंत ही योजना सुरु राहणार  आहे. या योजनेंतर्गत ५० टक्के कर आणि दंड भरावा लागेल असे त्यांनी सांगितले.  बेहिशेबी मालमत्ता किंवा रक्कम जाहीर करणा-यांचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे.