रविवार, 28 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2024 (09:39 IST)

मुख्यमंत्री नितीश यांनी अयोध्या आणि सीतामढीला जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पाबद्दल पंतप्रधान मोदींचे मानले आभार

Chief Minister Nitish Kumar
केंद्रीय मंत्रिमंडळाने नरकटियागंज-रक्सौल-सीतामढी-दरभंगा आणि सीतामढी-मुझफ्फरपूर या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी दिल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. तसेच केंद्राच्या या निर्णयामुळे अयोध्या आणि सीतामढी दरम्यान प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंसाठी रेल्वे प्रवास सोप्पा होईल.
 
मिळालेल्या माहितीनुसार कुमार म्हणाले की, "22 सप्टेंबर रोजी एका पत्राद्वारे मी आदरणीय पंतप्रधानांना माता सीतेचे जन्मस्थान असलेल्या सीतामढी (पुनौरा धाम) रेल्वे कनेक्टिव्हिटीबाबत विनंती केली होती. तसेच अयोध्या ते सीतेची जन्मभूमी सीतामढीपर्यंत सुमारे 256 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग 4,553 कोटी रुपये खर्चून दुहेर करण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे.
 
तसेच या रेल्वे मार्गाच्या निर्मितीमुळे भाविकांना अयोध्येबरोबरच माता सीतेचे जन्मस्थान पुनौरा धाम येथे जाणे सोयीचे होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले असल्याचे निवेदनात सांगितले आहे.

Edited By- Dhanashri Naik