मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 4 सप्टेंबर 2022 (11:06 IST)

काँग्रेसचं दिल्लीत आज आंदोलन

महागाई, बेरोजगारी आणि जीएसटीच्या मुद्यावरून काँग्रेसचं आज आंदोलन आहे. 4 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसकडून रॅली काढली जाणार आहे.
 
'महागाई पर हल्ला बोल' अशी घोषणाबाजी करत काँग्रेस भाजपला घेरण्याच्या तयारी आहेत.
 
काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयातून सकाळी नऊ वाजल्यापासून बसची सोय करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी सुद्धा पक्ष मुख्यालयातून बसने दिल्लीतील रामलीला मैदावावर येऊ शकतात.
 
या आंदोलनात दिल्लीसह हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
 
तसंच येत्या 7 सप्टेंबरपासून काँग्रेसचे काश्मीर ते कन्याकुमारी भारत जोडो आंदोलन सुरू होणार आहे.