शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 11 ऑक्टोबर 2018 (07:55 IST)

हिऱ्याने बदली जिंदगी, सापडला हिरा

हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेल्या पन्नामध्ये भाडेपट्ट्याने घेतलेल्या जमिनीत खोदकाम करत असताना एका मजुराला  42.59 कॅरेटचा हिरा सापडला आहे. मोतीलाल प्रजापती याला हा हिरा सापडला असून या हिऱ्याची किंमत कमीतकमी दीड कोटी रूपये आहे. पन्ना इथल्या हिरे खाणीत सापडलेला हा सगळ्यात जास्त वजनी दुसऱ्या क्रमांकाचा हिरा आहे. यापूर्वी 1961 साली इथे 44.55 कॅरेटचा हिरा सापडला होता.
 
मोतीलाल आणि त्यांच्या चार भागीदारांनी मिळून २५० रूपये प्रतिवर्ष या दराने जमीन खोदण्याचं काम मिळवलं होतं. मोतीलाल हा दुसऱ्यांच्या जमिनीत खोदकाम करत होता. किती दिवस दुसऱ्यांसाठी जमीन खोदायची असा विचार मनात आल्याने त्याने स्वत: जमिनीचा छोटा पट्टा खोदायला घेतला होता. त्याचा हा निर्णय आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. हिऱ्याची किंमत निश्चित झाल्यानंतर त्यावरील कर सरकार कापून घेईल आणि उरलेली रक्कम हिरालालला देण्यात येईल. ही रक्कम हिरालाल आणि त्याच्या साथीदारांमध्ये वाटली जाणार आहे.