1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 29 जानेवारी 2022 (10:17 IST)

डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन भारताचे नवीन आर्थिक सल्लागार

डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची भारताच्या नवीन आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी 28 जानेवारीला पदभार स्वीकारला

अर्थमंत्रालयाने ट्वीट करत याविषयीची माहिती दिली.

या आधीचे मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ डिसेंबर 2021मध्ये संपला होता. त्यानंतर आता ही जबाबदारी डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांना देण्यात आली आहे.
 
डॉ. नागेश्वरन यांनी यापूर्वी लेखक, शिक्षक आणि सल्लागार म्हणून भारत आणि सिंगापूरमध्ये काम केलं आहे.