घोडे खरेदीसाठी डिजिटल मनी
पूर्ण देशात आता व्यवहार हे ई पेमेंट ने होत आहेत. असाच प्रकार घोडे खरेदीत घडला आहे. गुजरात आणि महाराष्ट्र सीमेवर असलेल्या आणि पूर्ण देशात प्रसिद्ध घोडेबाजरात खरेदी आता डिजिटल स्वरुपात होत आहे. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा दत्त जयंती निमित्त भरणाऱ्या घोडे बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या येथील यात्रेवरही नोटबंदीचा परिणाम जाणवत आहे. परिणामी घोडे खरेदी विक्रीचे व्यवहारही आज येथे डिजिटल पेमेंटने करण्यात आले. अनेकांनी आरटीजीएस, इंटरनेट बँकींग आणि चेकच्या माध्यमातून हे व्यवहार पूर्ण केले.
सारंगखेडा हे श्री दत्ताचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी दत्तजयंतीच्या दिवशी भरणाऱ्या यात्रेत घोड्यांची खरेदी विक्री हे या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य. यंदाही देशभरातून ३००० घोडे येथे विक्रीला आले आहेत. अनेकांनी डिजिटल पेमेंटचा स्वीकार केल्याचे आधुनिक चित्र या पारंपरिक जत्रेत पाहायला मिळाले आहे. थोडा त्रास आहे मात्र नागरिक आता डिजिटल व्यवहार करत आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे.