बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 24 जानेवारी 2023 (14:49 IST)

Earthquake in Delhi-NCR: दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, उत्तराखंडमध्येही भूकंप

दिल्ली-एनसीआरमध्ये मंगळवारी दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्येही अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तराखंडची राजधानी डेहराडून पिथौरागढ आणि अल्मोडा येथेही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की लोकांना ते त्यांच्या घरांमध्ये आणि कार्यालयांमध्ये जाणवले. मात्र, अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृतसमोर आलेले नाही. 

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार  2.28 वाजता भूकंप झाला.त्यांची तीव्रता 5.8 होती. भूकंपाचे केंद्र नेपाळमध्ये जमिनीपासून 10 किमी अंतरावर असल्याचे सांगण्यात येत आहे.

यापूर्वी 5 जानेवारी रोजी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. जम्मू-काश्मीरमध्येही पृथ्वी हादरली तेथेही लोकांना भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ५.९ एवढी होती. त्याचे केंद्र अफगाणिस्तानचा हिंदुकुश प्रदेश होता 
 
Edited By- Priya Dixit