सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 11 सप्टेंबर 2024 (19:28 IST)

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमधील उधमपूर आणि कठुआ जिल्ह्यातील जंगलात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत लष्कराच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

चकमक सुरू झाल्यापासून सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला होता. ऑपरेशन अजूनही सुरू आहे. उधमपूर आणि कठुआ जिल्ह्यातील या संवेदनशील भागात सुरक्षा दलांनी सखोल शोधमोहीम सुरू केली आहे.

मुसळधार पाऊस आणि परिसरात कठीण भौगोलिक परिस्थिती असतानाही सुरक्षा दलांना दहशतवाद्यांचा शोध घेण्यात यश आले आहे. परिसरात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला असून नागरिकांना कोणत्याही संशयास्पद हालचालींची तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Edited by - Priya Dixit