रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 एप्रिल 2019 (17:36 IST)

आयएनएस विक्रमादित्य युद्धनौकेवर आग

नौदलात कार्यरत असलेली आयएनएस विक्रमादित्य या युद्धनौकेवर आग लागली. या घटनेत एका नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. विक्रमादित्य सध्या कर्नाटक येथील कारवार किनाऱ्यावर आहे. शुक्रवारी सकाळी नौकेवर तैनात असलेल्या लढाऊ विमानाला आग लागली. ही आग विझवत असताना डी. एस. चौहान हे नौदल अधिकारी जखमी झाले होते. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाला. वेळीच आग आटोक्यात आणल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.