किम जाँग-उन आणि व्लादिमिर पुतिन यांच्यात चर्चा होणार

Kim Jong Un, Putin
Last Updated: गुरूवार, 25 एप्रिल 2019 (12:23 IST)
उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जाँग-उन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यामध्ये व्लादिवोस्तोक येथे आज (गुरुवारी) चर्चा होणार आहे.
रशियाच्या पूर्वेस व्लादिवोस्तोक येथे रस्की बेटावर या दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. कोरियन द्वीपकल्पावरील अणु कार्यक्रमाच्या प्रश्नावर चर्चा करू असे रशियाने स्पष्ट केले आहे तर अमेरिकेशी चर्चा निष्फळ ठरल्यावर रशियाचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे किम यांनी सांगितले.

उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर किम आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यात या वर्षी हनोई येथे चर्चा झाली होती. परंतु या चर्चेमधून कोणताही तोडगा निघाला नाही.
बुधवारी किम व्लादिवोस्तोक येथे रेल्वेने दाखल झाले. रशियन राष्ट्राध्यक्षांशी ही त्यांची पहिलीच चर्चा-परिषद आहे. रशियन अधिकाऱ्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच ब्रास बँडने स्वागत झाल्यानंतर त्यांच्या गाडीबरोबर नेहमीप्रमाणे सुरक्षारक्षक पळताना दिसून आले.

कोरियाची सीमा ओलांडल्यानंतर खासान येथे किम रशियन वाहिन्यांशी बोलताना म्हणाले, "आमच्या लोकांच्या इच्छेनुसार मी रशियामध्ये दाखल झालो आहे. ही भेट यशस्वी ठरेल अशी मी आशा करतो."
"कोरिया द्वीपकल्पावरील प्रश्नांची तड लागेल अशा पद्धतीची चर्चा या भेटीत होईल आणि द्वीपक्षीय संबंधांच्या वाढीबाबत चर्चा होईल", असाही विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ही शिखर परिषद कशी असेल?
रस्की बेटावर रशिया आणि उत्तर कोरियाचे झेंडे आधीच लावून झाले असून दोन्ही नेत्यांची बैठक येथील विद्यापीठाच्या आवारात होण्याची शक्यता आहे.

"कोरिया द्वीपकल्पावरील अण्वस्त्रांचा प्रश्न सोडवण्यासाठी सध्या स्थगित झालेला सहापक्षीय चर्चेचा पर्याय सर्वोत्तम असल्याचे", मत रशियाच्या सरकारचे आहे असे रशियन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते दमित्रि पेस्कोव यांनी व्यक्त केले.
ही सहापक्षीय चर्चा 2003 मध्ये सुरू झाली होती. त्यामध्ये उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, चीन, जपान, रशिया, अमेरिका यांचा समावेश होता.

याशिवाय "इतर कोणताही प्रभावी आंतरराष्ट्रीय मार्ग नसल्याचे", पेस्कव यांनी सांगितले.

दोन्ही देशांना काय हवं आहे?
"अमेरिकेशी बोलणी फिसकटल्यावर आपल्याकडे मोठा सहकारी देश आहे हे दाखवण्याची उत्तर कोरियाकडे संधी आली आहे असं या भेटीकडे पाहिलं जात असल्याचं", बीबीसीच्या लॉरा बिकेर यांनी सांगितलं.
फेब्रुवारीमध्ये हनोई येथे झालेली चर्चा निष्फळ होण्याचं खापर उत्तर कोरियाने अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट माइक पोम्पेओ यांच्यावर फोडले होते.

माइक पोम्पेओ असंबद्ध बडबडत असून त्यांना अणु कार्यक्रम चर्चेतून काढून टाकावे आणि कोणीतरी काळजीपूर्वक बोलणारी व्यक्ती नेमली जावी अशी मागणी उत्तर कोरियाने या महिन्याच्या सुरुवातीस केली होती. "उत्तर कोरियाचे आर्थिक भविष्य केवळ अमेरिकेवर अवलंबून नाही हे दाखवण्याची संधी या परिषदेतून आली आहे", असं मतही बिकेर यांनी व्यक्त केलं.
उत्तर कोरियावरील बंधनं शिथिल व्हावीत यासाठीही किम रशियाकडे प्रयत्न करतील असं सांगण्यात येतं.

तर, कोरिया द्वीपकल्पावरील प्रश्नाच्या बाबतीत आपण महत्वाचे पक्ष आहोत हे दाखवण्याची संधी रशियाला मिळाल्याचे मत विश्लेषक व्यक्त करतात.

ट्रंप आणि किम यांच्या दोन शिखर परिषद चर्चांमध्ये रशियाला बाजूला टाकल्यासारखे झाले असले तरीही किम यांना भेटण्यासाठी पुतिन उत्सुक आहेत.
उत्तर कोरियाकडे अण्वस्त्र असणं अमेरिका, चीनबरोबर रशियालाही अस्वस्थ करणारं आहे.

रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यामध्ये कितपत जवळीक आहे?
शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत रशियाने वैचारिक आणि धोरणात्मक कारणामुंळे आपला कम्युनिस्ट सहकारी देश उत्तर कोरियाशी चांगले लष्करी व व्यापारी संबंध ठेवले होते.

1991 साली सोव्हिएत युनियन भंगल्यावर उत्तर कोरियाचे रशियाशी व्यापारी संबंध कमी झाले आणि त्यांचा चीन हा प्रमुख सहकारी झाला.
पुतिन यांच्या कार्यकाळामध्ये रशियाची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर त्यांनी उत्तर कोरियाचे सोव्हीएट काळातील बहुतांश कर्ज माफ करून टाकले.

रशियाला उत्तर कोरियाच्या संबंधामुळे कितपत फायदा होईल हा चर्चेचा विषय आहे. परदेशी शक्तींचा विचार केल्यास उत्तर कोरियाकडून कमी धोका आहे असे रशियाला वाटते.

यावर अधिक वाचा :

अयोध्या प्रकरणात पुनर्विचार याचिकेमुळे काय बदल होईल?

अयोध्या प्रकरणात पुनर्विचार याचिकेमुळे काय बदल होईल?
अयोध्येच्या वादग्रस्त जमिनीच्या वादावर सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने 9 नोव्हेंबरला ...

प्रसिद्ध गायिका गीता माळी यांचा अपघात सीसीटीव्हीत कैद, ...

प्रसिद्ध गायिका गीता माळी यांचा अपघात सीसीटीव्हीत कैद, व्हिडियो प्रचंड व्हायरल
प्रसिद्ध गायिका आणि नाशिकच्या रहिवासी गीता माळी या प्रवास करत असलेली कार गॅस टँकरला ...

Tik-Tok पुन्हा अडचणीत, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका ...

Tik-Tok पुन्हा अडचणीत, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
पूर्वी एकदा कोर्टाने बंदी घातलेल्या Tik-Tok विरोधात आता पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात ...

राजधानी मुंबईच्या मनपाच्या महापौर किशोरी पेडणेकर

राजधानी मुंबईच्या मनपाच्या महापौर किशोरी पेडणेकर
मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांचे नाव निश्चित झाले आहे. ...

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी सरकार स्थापनेबाबत ...

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली नाही
महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबतचा पेच अद्याप कायम असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद ...