1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 5 ऑक्टोबर 2022 (21:34 IST)

मोदींकडून पाडव्याच्या मराठीत शुभेच्छा

narendra modi
PM Modi Gudi Padwa Wishes : राज्य भरात गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. दरम्यान 2 वर्षांनंतर जल्लोषात यावर्षी गुढीपाडवा साजरा केला जात आहे, त्यामुळे आजचा दिवस खास असून आहे कारण यंदाचा गुढीपाडवा निर्बंधमुक्त होणार असल्याने राज्यभरात नव्या वर्षाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. मात्र, यंदा राज्य सरकारने गुढीपाडव्याच्या शोभायात्रांना परवानगी दिल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सर्व स्तरांतून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. राजकीय नेतेमंडळींनीही नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. 
 
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी बांधवांना गुढीपाढव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी खास मराठीतून ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की,  गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आनंद आणि उत्तम आरोग्याचे जावो अशी मी प्रार्थना करतो. आगामी वर्षात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.