शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 16 सप्टेंबर 2017 (09:59 IST)

गुरमीत राम रहीम याच्याविरोधात आज सुनावणी

गुरमीत राम रहीम याच्याविरोधात डेरा सच्चा सौदाचा प्रमुख  आणखी दोन हत्येप्रकरणी न्यायालयात सुनावणी होणार आहे.हरयाणामधील पंचकुला येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. 

गुरमीत राम रहीम याला गेल्या 25 ऑगस्ट रोजी  दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी सीबीआयच्या न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर त्याला कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पत्रकार रामचंद्र छत्रपती आणि डेरा सच्चा सौदाचा माजी व्यवस्थापक रणजीत सिंह सिरसा येथील  यांची हत्या केल्याचा आरोप गुरमीत राम रहिम याच्यावर आहे. हत्येच्या खटल्याची सुनावणी सुद्धा सीबीआयच्याच न्यायालयात आज होणार आहे.