बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 13 मार्च 2019 (08:59 IST)

हर्दिक पटेल यांचा अधिकृतरित्या काँग्रेसमध्ये प्रवेश

हर्दिक पटेल यांनी ‘ मी अधिकृतरित्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. पक्षाची वर्किंग कमिटीची बैठक संपल्यानंतर जाहीर सभेत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहे. मी काँग्रेसची विचारधारा गावोगाव घेवून जाईन.’ असे सांगितले होते. 
 
हार्दिक पटेल यांनी महात्मा गांधीजींच्या दांडी यात्रेचा आधार घेत ‘गांधीजींनी आजच्या दिवशी मीठाचा सत्याग्रह सुरु करुन मी इंग्रजांची सत्ता उलथवून टाकीन असे सांगितले होते. आज मी याच काँग्रेसशी जोडला जाणार आहे. याच काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहलाल नेहरु, सरदार पटेल, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी भारताला सक्षम बणवण्याचे काम केले आहे.’ असे वक्तव्य केले