गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 15 ऑक्टोबर 2024 (17:25 IST)

एअर इंडियाच्या विमानात बॉम्बची माहिती,अयोध्या विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

air India
एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याच्या वृत्ताने अयोध्येतील महर्षी वाल्मिकी विमानतळावर खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, विमान अयोध्या विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात आले आहे.

या विमानात 139 प्रवासी होते. जिल्हा प्रशासनही सतर्क झाले आहे. लँडिंगनंतर विमानाची तपासणी केली जाईल.
प्रवाशांना सुखरूप खाली उतरवले आहे. एटीएसचा ताफा देखील विमानतळावर उपस्थित असून विमानाची पाहणी केली जात आहे. विमानतळावरील प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. 
 
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाला महर्षी वाल्मिकी विमानतळावर उतरवले आहे. 24 तासांच्या आतच एअर इंडियाच्या विमानात बॉम्बची धमकी दुसऱ्यांदा देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सध्या काहीही सांगण्यास नकार दिला आहे. 
Edited By - Priya Dixit