शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 30 मे 2023 (10:38 IST)

Jammu Bus Accident: अमृतसरहून माता वैष्णोदेवीला जाणारी बस दरीत कोसळली , 10 जणांचा मृत्यू

accident
अमृतसरहून कटरा येथे जाणारी बस खोल दरीत कोसळून 10 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
 
याबाबत अधिक माहिती देताना एसएसपी चंदन कोहली म्हणाले की, अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे तर 55 जण जखमी आहेत. यावेळी स्थानिक नागरिकांनीही मदत केली. याशिवाय सीआरपीएफची टीमही घटनास्थळी पोहोचली असून जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.
 
पंजाबमधील अमृतसरहून श्री माता वैष्णोदेवी कटडा येथे जाणाऱ्या भाविकांची बस झज्जर कोटली भागात पुलावरून खाली पडली. पुलावरील खंदक सुमारे 50 फूट खोल असल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंट अशोक चौधरी यांनी सांगितले की, सीआरपीएफ, पोलिस आणि इतर टीमही येथे हजर आहेत. रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मृतदेहही रुग्णालयात नेण्यात आले आहेत.
 
बसखाली कोणी अडकले आहे का, हे पाहण्यासाठी येथे क्रेन आणली जात आहे. बचावकार्य सुरू आहे. ही बस अमृतसरहून येत होती आणि त्यात बिहारचे लोक होते. ते बहुधा कटरा जाण्याचा रस्ता विसरून इथे पोहोचले असावेत.
 
Edited by - Priya Dixit