शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: श्रीनगर , सोमवार, 10 एप्रिल 2017 (11:10 IST)

कुपवाडा सेक्टरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नातील चार दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

जम्मू काश्मीरमधील कुपवाडा सेक्टरमध्ये भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या चार दहशतवाद्यांना सैन्याने कंठस्नान घालले आहे. दहशतवाद्यांनी रविवारी रात्रीच्या अंधारात हा घुसखोरीचा प्रयत्न केला होता.
 
कुपवाडामधील केरनमध्ये काही दहशतवादी भारतात घुसखोरी करत होते. या दरम्यान गस्तीवर असलेल्या सुरक्षा दलाच्या सतर्क जवानांनी या दहशतवाद्यांवर गोळीबार केला. या गोळीबारात चार दहशतवाद्यांचा खात्मा झाला. पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने हे दहशतवादी भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात होते. या भागात अजूनही सैन्याची शोधमोहीम सुरु आहे.
 
गेल्या वर्षभरापासून पाकिस्तानकडून घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. २०१६ मध्ये पाकिस्तानमधून भारतात घुसखोरीच्या ३७० घटना घडल्या. २०१५ मध्ये हे प्रमाण १२२ एवढेच होते. म्हणजेच सरासरी बघितल्यास २०१६ मध्ये दररोज पाकिस्तानमधून येणाऱ्या दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरीचा प्रयत्न केला होता.