शनिवार, 24 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

प्रसिध्द कार्डियोलॉजिस्टचा हार्ट अटॅकने मृत्यू

गुजरातमधील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ गौरव गांधी यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. जामनगरच्या 41 वर्षीय गौरव यांनी जवळपास 16,000 रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या होत्या.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार डॉक्टर गौरव सोमवारी सिटी पॅलेस रोडवरून त्यांच्या एका रुग्णाला भेटून घरी परतले. रात्रीचे जेवण करून ते आपल्या खोलीत झोपायला गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी कुटुंबीयांना ते बेशुद्ध अवस्थेत आढळले तेव्हा त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
 
प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गौरव गांधी जामनगरमधून वैद्यकीय पदवी पूर्ण करून आणि अहमदाबाद येथील हृदयरोगतज्ज्ञांमध्ये विशेष प्रशिक्षण घेऊन जामनगरला परतले. फेसबुकवरील हाल्ट हार्ट अटॅक मोहिमेशीही ते जोडले गेले होते.